ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जामसंडेत दुकानाला भीषण आग ; लाखो रुपयांचे नुकसान ..!

जामसंडेत दुकानाला भीषण आग ; लाखो रुपयांचे नुकसान ..!

प्रकाशन: 20 Dec 2023 12:10 PM
वाचन संख्या 261

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला मध्यरात्री १२ च्या दरम्यान अचानक आग लागल्यामुळे दुकानामधील वस्तू आगीच्या भक्षस्थानी जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लगतच्या ग्रामस्थांनी तसेच पटेल बंधूनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे विनोद पटेल दुकानातील सामानांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आगीचे कारण नेमके अद्यापही समजू शकले नाही. मालक पटेल हे नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले रात्री सव्वा बाराच्या सुमारास भगवती ट्रेडर्स दुकानाच्या वरील मजल्यावरील रहिवाशी यांनी दुकानांमध्ये आग लागल्याची माहिती दिली मात्र दुकानाच्या ग्रीलमध्ये पाण्याच्या टाक्या कलर सामान असल्यामुळे आत मध्ये जाणे शक्य होत नसल्याने पटेल बंधू येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते घटनेची माहिती नगरपंचायत प्रशासनाला मिळतात नगरपंचायतीचे कर्मचारी अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु विनोद पटेल यांच्या हार्डवेअर मध्ये असलेल्या बऱ्याच वस्तूंनी पेठ घेतल्यामुळे पटेल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळतात नगरसेवक बुवा तारी, विशाल मांजरेकर स्थानिक व्यापारी पटेल बंधू तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असले तरी विनोद पटेल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स