ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा ग्रामपंचायत व रुक्मिणी सुपर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा ग्रामपंचायत व रुक्मिणी सुपर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न.

प्रकाशन: 20 Dec 2023 01:42 AM
वाचन संख्या 140

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा ग्रामपंचायत व रुक्मिणी सुपर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ३४० रुग्णांनी लाभ घेतला. तर ३२४ रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर तोरसे (गोवा) येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. सीमा खडपे, रुक्मिणी सुपर बाजारचे संचालक विजय तोरसकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर, साईप्रसाद काणेकर, आबा धारगळकर, सौ. रुपाली शिरसाट, सौ. श्रेया केसरकर, सौ. तनुजा वराडकर, प्रशांत बांदेकर, सौ. देवल येडवे, सौ. दिपलक्ष्मी पटेकर, साईश तोरसकर, शैलेश केसरकर, सुशांत ठाकूर, रमेश बुठे, धुरी आदी उपस्थित होते.

या शिबिरात दिवसभरात ३४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी ३२४ रुग्णांना तीन हजार रुपये किमतीचा चष्मा १६० रुपये किमतीत वितरित करण्यात आला. बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सांगितले की ग्रामपंचायतच्या वतीने अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून रुक्मिणी सुपर बाजारच्या सहकार्याने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विजय तोरसकर यांनी आभार प्रदर्शन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स