नारिंग्रे येथे दिव्यांगांच्या विभागीय मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहु उद्देशीय शिक्षण संस्था कसाल आणि नारिंग्रे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्तरावरील दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून नारिंग्रे येथे विभागीय स्तरावर दिव्यांग बांधवांचा मेळावाआयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे व अपंग वित्त महामंडळाचे पदाधिकारी नितीन परब यांनी शासकीय निमशासकीय योजनांची व सुविधांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना दिव्यांग साहित्य, उपकरणे व साधने या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच चार अंध दिव्यांग बांधवांना पांढरी काठीचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे ७० दिव्यांग बांधवांची सभासद नोंदणी करण्यात आली. यावेळी साईकृपा संस्थेच्या तालुकाध्यक्ष आरती बापट यांनी अहवाल वाचन केले.प्रास्ताविक संस्थाध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले.तर आभार सुनील बापट यांनी मानले.
या मेळाव्याला गांवचे सरपंच महेश राणे, संस्थाध्यक्ष अनिल शिंगाडे , श्यामसुंदर लोट, दिक्षा तेली, प्रकाश सावंत, प्रकाश वाघ, सत्यवान पावले, अपंग वित्त महामंडळाचे पदाधिकारी नितीन परब, श्री साळवी,संस्थेचे वरिष्ठ लिपिक निलम राणे. तालुकाध्यक्ष आरती बापट, सुनील बापट आदी तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. या मेळाव्याला उपस्थितांना अल्पोपाहार व भोजन व्यवस्था नारिंग्रे ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती. मेळाव्याला तालुकाध्यक्ष आरती बापट व सुनील बापट यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)