ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
माऊली मित्रमंडळ, कणकवली नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय नमः आणि राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळ यांच्या वतीने आपली सिंधुनगरी चॅनेल समूहाच्या मुख्य संचालक व शिक्षिका सौ. फिलोमीना पंडित यांचा सत्कार.

माऊली मित्रमंडळ, कणकवली नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय नमः आणि राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळ यांच्या वतीने आपली सिंधुनगरी चॅनेल समूहाच्या मुख्य संचालक व शिक्षिका सौ. फिलोमीना पंडित यांचा सत्कार.

प्रकाशन: 18 Dec 2023 02:47 PM
वाचन संख्या 248

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या मुख्य संचालक आणि रोझरी इंग्लिश स्कूल या प्रशालेमध्ये २७ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. फिलोमीना सुयोग पंडित यांचा कणकवलीतील माऊली मिञमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय नमः आणि राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळ यांच्या हस्ते अविनाश गावडे आणि हेमंत नाडकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन रविवारी १७ डिसेंबरला सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी माऊली मित्रमंडळाचे संस्थापक संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सन्मानाला उत्तर देताना सौ. फिलोमीना पंडित यांनी सर्व मंडळांचे आभार मानले.

यावेळी अविनाश गावडे, भगवान कासले, हेमंत नाडकर्णी, प्रसाद घाडीगांवकर, प्रसाद पाताडे, विशाल रजपूत, ज्ञानेश्वर मोडक, महेश वायंगणकर, सईद नाईक आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स