ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वाडा हायस्कूल मध्ये १९९१ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

वाडा हायस्कूल मध्ये १९९१ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

प्रकाशन: 17 Dec 2023 07:27 PM
वाचन संख्या 240

संतोष साळसकर | सहसंपादक : शिक्षणामुळे अनेक क्षेत्रामधून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती केली आहे. यामुळे ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतले ती शाळा म्हणजे मंदिर आहे. यामुळे प्रत्येक विदयार्थ्याने शाळेसाठी आपापल्या पध्दतीने योगदान दिले पाहिजे. व स्नेहमेळावे घेवून शैक्षणिक काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे असे मत वाडा हायस्कुलचे मुख्याध्यापक नारायण माने यांनी व्यक्त केले. अ. कृ. केळकर वाडा हायस्कुलमध्ये १९९२ सालच्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपिठावर लोकल कौन्सीलचे शांताराम पुजारी, देवगड एज्युकेशन बोर्डचे सदानंद पवार, माजी मुख्याध्यापक मनोहर भगत, टि.बी.पाटील, सौ. अनुराधा दीक्षित मॅडम, नाईकवडी, डि.व्ही.जोशी, हिरनाईक सर, खरात सर, संजीवनी फडके, उल्का जोशी, सातवळेकर सर प्रकाश मराठे आदी उपस्थित होते. तर माजी विद्यार्थी राजा परब, योगेश गुरव, देवगड तालुका पत्रकार समिती अध्यक्ष व माजी विद्यार्थी अयोध्याप्रसाद गांवकर, श्रीनिवास मराठे, सचिन देसाई, कुंदा पडेलकर,जय कोयंडे, शरद आचरेकर, सुजाता जाधव, सुरभी राजू तावडे ्रशांत मेस्त्री,संदिप वाडेकर,दिपक तारी, जय कोयंडे व १९९१ सालचे दहावीचे माजी विदयार्थी व विदयार्थींनी उपस्थित होते. वाडा हायस्कुलच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेझिम पथक व ढोल ताशाने शाळेमध्ये शिक्षकांसहित माजी विदयार्थ्यांनी प्रवेश केला.

१९९१ सालच्या मित्र मैत्रिणींचे निधन पावलेल्या विद्यार्थ्यांना भावपुर्ण श्रध्दांजली यावेळी वाहण्यात आली. तसेच दहावीमधील मार्च २०२३ गुणवंत विदयार्थ्यांना भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच सध्या शाळेमधील विविध क्रिडा क्षेत्रामध्ये प्रविण्य मिळविलेल्या विदयार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच या १९९१ सालच्या दहावीच्या वाडा हायस्कुलच्या माजी विदयार्थ्यांनी एका शिक्षक वर्गखोलीची रंगरंगोटी करण्यात आली. ३२ वर्षानंतर वाडा हायस्कुलचे माजी विद्यार्थी भेटल्यानंतर शैक्षणिक आठवणी ताज्या झाल्या होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स