ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
लोककला अभ्यासक सदानंद राणे यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक कला गौरव पुरस्कार जाहीर ; ओझरम गांवचे सुपुत्र.

लोककला अभ्यासक सदानंद राणे यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक कला गौरव पुरस्कार जाहीर ; ओझरम गांवचे सुपुत्र.

प्रकाशन: 14 Dec 2023 12:38 AM
वाचन संख्या 283

कासार्डे | निकेत पावसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
कणकवली तालुक्यातील ओझरम गांवचे सुपुत्र लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक, ज्येष्ठ नृत्य नाट्य दिग्दर्शक सदानंद राणे यांना महाराष्ट्र शासनाचा नृत्य विभागाचा२०२३ सालचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे कला क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामध्ये सदानंद राणे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदानंद राणे यांनी गेल्या ५३ वर्षात कला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १९७९ ते १९८ १राष्ट्र सेवादल कला पथक निर्मित महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, आजादी की जंग, शिव दर्शन या कार्यक्रमातून नाट्य, नृत्य कलाकार म्हणून भाग घेऊन संपूर्ण भारत दौरा केला. त्यासाठी कवी प्रा. वसंत बापट, लोकशाहीर लीलाधर हेगडे, नृत्य दिग्दर्शिका सुधाताई वर्दे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सदानंद राणे यांनी सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरील जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली पारंपारिक लोक नृत्य स्पर्धा धिना धिन धा या स्पर्धेचे अनेक वर्षे सन्माननीय परीक्षक म्हणून काम पाहिले.

कामगार वस्तीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील निरनिराळ्या वयोगटातील मुला मुलींना अग्रक्रमाने प्राधान्य देऊन नृत्य, नाट्य, संगीत यांचे विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रंगमंच मिळवून देण्यासाठी १९८५ साली सांस्कृतिक चळवळ जपणारी पदन्यास संस्थेची स्थापना केली. त्यामाध्यमातून राज्यभर अनेक सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. विविध ठिकाणी गेली ३५ वर्षे संगीत, नृत्याचे ते कार्यशाळा घेतात. विविध कला महोत्सवात त्यांनी आपल्या कलेने वेगळी ओळख निर्माण केली.

सदानंद राणे यांची लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक, ज्येष्ठ नृत्य, नाट्य दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. त्यांना यावर्षी सांस्कृतिक कला दर्पण पुरस्कार, आनंद दिघे संस्था, खासदार राजन विचारे, नवरत्न पुरस्कार ठाणे, झपूर्झा संस्था विरार, कार्य भुषण पुरस्कार, सांस्कृतिकचा ठाणे अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स