ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी एका वाहनचालकाला लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण..!

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी एका वाहनचालकाला लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण..!

प्रकाशन: 14 Dec 2023 12:09 AM
वाचन संख्या 190

टाळी एका हाताने वाजत नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे..!

ब्युरो न्यूज | नागपूर : कोणत्यातरी कारणावरून झालेल्या एका वादानंतर टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी एका कार वाहन चालकाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. वर्धा मार्गावरील वडगांव नजिकच्या टोल नाक्यावर बुधवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तिथून जाणाऱ्या एका दुसर्या वाहनचालकाने या मारहाणीचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना आणि कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीमुळे नेहमी चर्चेत असणारा ‘टोल नाका’ पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, एक तरुण वाहनचालक आज सायंकाळी या टोलनाक्यावरून वाहन घेऊन जात होता. टोलची रक्कम अन् दुसऱ्या कुठल्याशा कारणावरून टोलवरील कर्मचाऱ्यासोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढत गेला. त्यानंतर टोलवरील कर्मचारी तसेच गार्डसनी त्या तरुणाला हातबुक्क्या तसेच काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी झाला. गंभीर परिणामाची कल्पना आल्यामुळे टोलवरील कर्मचाऱ्यांनी लगेच रुग्णवाहिका बोलवली आणि त्याला नागपूरच्या दिशेने घेऊन गेले. त्या जखमी तरुणाचे नांव काय, तो कुठला आणि त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, ते कळले नाही. मात्र, या बेदम मारहाणीच्या घटनेच्या वेळी वर्धा येथील रहिवासी प्रवीण हिवरे जात होते. त्यांनी मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडीओ तयार करून तो आपल्या मित्रमंडळींना पाठवून सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, हिवरे यांनी या घटनेची लेखी तक्रार नागपूर विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. विशेष म्हणजे, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचे वर्तन अत्यंत उर्मट असल्याचे आणि वाहनधारकांसोबत ते अपमाणजनक पद्धतीने बोलतात, अशी नेहमीच तक्रार आहे.

या संबंधाने वादाचे कारण जाणून घेण्यासाठी या टोल नाक्याचे कामकाज बघणारे हर्षल देवके आणि राहुल डांगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशी घटना घडल्याचे मान्य केले. मात्र, टाळी एका हाताने वाजत नसल्याचे म्हणत ‘त्या’ कारचालकाने आधी टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्याचे दगडाने डोके फोडले. त्यामुळेच नाक्यावर त्याला मारहाण झाल्याचे सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स