आमदार वैभव नाईक यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये ; शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांची टीका.
आरोग्य यंत्रणांवर विधानसभेत भाष्य करणे हास्यास्पद असल्याचाही लगावला टोला…!
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ – मालवण विधानसभा आमदार वैभव नाईक यांनी शासकिय आरोग्य यंत्रणे बाबत केलेले आरोप हे संपूर्ण बिनबुडाचे आहेत असे नमूद करत शिवसेना ( शिंदे गट ) तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे जोरदार टीका केली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या पक्षामार्फत म्हणजे उ.बा. ठा. मार्फत कणकवली विधानसभा मतदार संघात घेतलेल्या आरोग्य शिबिरांना सर्व आरोग्य यंत्रणा हि शासकिय होती. या आरोग्य शिबिरांची सर्व जबाबदारी ही शासकीय आरोग्य यंत्रणांनी घेतली होती आणि आता याच आरोग्य यंत्रणेवर आमदार वैभव नाईक यांनी टीका करणे आणि तेही विधानसभेमध्ये हे निश्चितच हास्यास्पद आहे असे आमदार वैभव नाईक यांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या जबाबदारीचे व नियोजनाचे फुकटचे श्रेय घेऊ नये. धमक असल्यास स्वः खर्चाने जनतेसाठी आरोग्य शिबिरे राबवावीत आणिअसे बिनबुडाचे आरोप करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे व प्रसिद्धी मिळविणे हे आमदार वैभव नाईक यांचे नित्याचे काम आहे असेही भूषण परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
विकासात्मक चर्चा करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या जवळ कोणताही मुद्दा नसल्याने तसेच स्वतः च्या मतदार संघातील त्यांचे भवितव्य अधांतरी झाल्याने आमदार वैभव नाईक यांची बडबड सुरु आहे अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर व तालुका समन्वयक सुनील पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)