माऊली मित्रमंडळ, शालेय मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजीमार्केट मित्रमंडळ यांच्याकडुन राजापुरमधील माजी आमदार यांची भेट
कणकवली/प्रतिनिधी: माऊली मित्रमंडळ, शालेय मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजी मार्केट यांच्या हस्ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानु खलिफे यांच्या राजापुर येथील निवासस्थानी भेट दिली.
विकासभाई सावंत ( माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ) यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहार पेडणेकर आणि मित्रमंडळाचे सदस्य यांच्या पुढे नाना विविध सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समस्यांवर चर्चा करत पेडणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीसाठी आमंत्रित केले.
यावेळी याप्रसंगी मित्रमंडळाच्या वतीने माजी आमदार खलीफे मॅडम यांचा भगवान कासले, महेश आंबेरकर यांच्या उपस्थितीत पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी या नात्याने गुरुचा आदरपूर्वक सन्मान केला.
यावेळी पेडणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना खलिफे मॅडम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती, असे सांगितले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समस्या जाणुन घेतल्या.
कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयाल औषधोपचारासाठी ७ लाख रुपयाची सढळ हस्ते मदत केली, परंतु ती सर्व सामान्यपर्यंत पोचली की नाही. हेदेखील समजणे कढीन आहे.
यावेळी संजय मालंडकर, सुनील काणेकर, भाई काणेकर महेश काणेकर, संगीता वाळके, सविता डेगवेकर, रेखा साळगांवकर, अविनाश गावडे, प्रसाद उगवेकर, प्रसाद पाताडे, प्रसाद उगावेकर, प्रसाद घाडीगांवकर, सईद नाईक, जमील कुरेशी, आनंद बाणे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)