ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सबळ पुरव्या अभावी आरोपींची निर्दोष मुक्तता..!

सबळ पुरव्या अभावी आरोपींची निर्दोष मुक्तता..!

प्रकाशन: 07 Dec 2023 09:51 PM
वाचन संख्या 118

कुडाळ/ प्रतिनिधी :आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अविनाश मोहन परब , अ‍ॅड.भाऊराव (चैतन्य)प्रकाश परब, अ‍ॅड.सुशांत श्यामसुंदर घाडीगावकर यांनी काम पाहिले.सदरचा गुन्हा हा मा. हू” कोर्टाचे स्थळसिमेत गाव आंबेरी, गोसावीवाडी ता. कुडाळ येथे दि. ३१/०३/२०२१ रोजी२२.०० वा चे मानाने व त्या सुमारास घडलेला आहे. वरील तारखेस वेळी व जागी यातील फिर्यादी सौ. मनिषा बाळकृष्ण पाटील यांचे पती साक्षीदार बाळकृष्ण वसंत पाटील हे त्यांचे घराचे पाठीमागे असलेल्या झाडांना पाणी घालत असताना आमच्या शेजारी राहाणारे आरोपीत नं. १ व २ यांनी फिर्यादी यांचे पती त्यांचे कोंबड्याबद्दल बोलताहेत हे ऐकूण फिर्यादी यांचे पती यांचेशी भांडण करुन त्यांना हाताचे थापटाने मारहाण करत असताना यातील फिर्यादी या त्यांचे पती यांना सोडविण्यासाठी गेल्या असताना यातील आरोपीत क्र. १ याने त्याचे हातातीललोखंडी शिग फिर्यादी यांच्या उजव्या हातावर मारुन दुखापत केली तसेच आरोपीत क्र. २ याने त्याचे हातातील बांबुचा दांडा फिर्यादी यांचे डाव्या पायावर मारुन दुखापत करुन फिर्यादी हीला धकलाबुकल करुन जमीनीवर पाडून आरोपीत क्र. १ व २ यांनी फिर्यादी व त्यांचे पती साक्षीदार यांना शिवीगाळी करुन ठार मारण्याची धमकी दिली म्हणून आरोपीत यांनी भा. दं.वि. क. ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे अपराध केल्याचा दोषारोप आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स