ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल तर्फे भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा...!

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल तर्फे भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा...!

प्रकाशन: 05 Dec 2023 10:02 PM
वाचन संख्या 24

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमन असोशिएशन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यंदा आपला २० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेमध्ये पुरूष (खुला गट) २१ किमी, मुले (वय १४ ते १७ गट) – ११ किमी, मुले (१४ वर्षाखालील गट)- मोती तलावास तीन फे-या, मुली (खुला गट) ११ किमी, मुली (१४ वर्षाखालील गट)- मोती तलावास तीन फे-या, मुले मुली (१० वर्षाखालील गट)- मोती तलावास एक फेरी, जेष्ठ नागरीक (५० वर्षावरील)- मोती तलावास दोन फे-या अशा प्रकारे सहभागी होऊ शकतील.मॅरेथॉन स्पर्धेची जग्गन्नाथराव भोसले उदयान येथून पहाटे ०६.०० वाजता सुरूवात होईल. मॅरेथॉन स्पर्धा विजेत्यांना आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. सदर स्पर्धा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमन असोशिएशनचे दिवंगत अध्यक्ष पी.एफ. डॉन्टस यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात येत आहे.इच्छुक स्पर्धकांनी आपली नोंदणी९४२०१९५५१८/७८२२९४२०८१ या कमांकावर करावी.जिल्हयातील होतकरू धावपटूंनी या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागीहोण्याचे आवाहन संस्थेचे सचिव श्री. सनिल राऊळ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स