ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भारतीय नौदल दिन कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रशासनाचे भाजपा शिष्ठमंडळाने मानले आभार

भारतीय नौदल दिन कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रशासनाचे भाजपा शिष्ठमंडळाने मानले आभार

प्रकाशन: 05 Dec 2023 10:31 PM
वाचन संख्या 78

ओरोस (प्रतिनिधी) : भारतीय नौदल दिनाचा मालवणतारकर्ली येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान देणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा भाजपच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट देवून आभार व्यक्त केले. जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेवून त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आला.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शन आणि निलेश राणे यांनी पालकमंत्री यांच्या खांद्याला खांदा लावून केलेलं नियोजनाचे काम, आमदार नितेश राणे, राजन तेली यांचे सर्वतोपरी सहकार्य या सर्वाचा परिपाक म्हणजे या कार्यक्रमाचे यश होय, असे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले. आज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे या सर्वांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेत आभार व्यक्त केले.यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी, संपुर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारा भारतीय नौदल दिनाचा कार्यक्रम ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे यशस्वीपणे संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दमदार नेतृत्वाला तेवढीच समर्थ साथ या जिल्ह्यातील जनता आणि त्यासोबत जिल्हा प्रशासनाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील सर्वांच्या दृष्टीने हा घरचा कार्यक्रम होता आणि त्या भावनेनेच प्रशासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावत आमच्या भाजपाकार्यकर्त्यांसह जनतेनेही रात्रंदिवस मेहनत घेतली.राजकोट किल्ल्याचे स्वरूप केवळ ७२ दिवसात बदलून तिथे उभारल्या जाणाऱ्या छत्रपतींच्या भव्यदिव्य पुतळ्याला साजेसा किल्ला उभा करण्याचे आव्हान बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम खात्याने यशस्वी करून शासकीय कामकाजाचा नवा आदर्श निर्माण केला. पोलीसांनी एकूणच व्यवस्था नियोजन डोळ्यात तेल घालून सांभाळले. इथली पोलीस यंत्रणा असेल, आरोग्य विभाग, बांधकाम खाते, विद्युत विभाग, नगरपालिका आणि एकूणच प्रशासन यंत्रणा या सगळ्यांनी आपल्या कार्यक्षमतेची सर्वोच्च प्रचिती दिली. हे एका अर्थाने नियोजन पर्वाचे शिवधनुष्य होते, पण ज्या पद्धतीने पूर्ण ताकद लावत आपल्या शासकीय यंत्रणेने ते उचलले त्याचे कौतुक खुल्या दिलाने करायला आम्हाला आनंद होत आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा, एसटी व्यवस्थापन, आरोग्य यंत्रणा या सर्वांचे यासाठी आम्ही अभिनंदन करत आहोत. सर्वानीच हा कार्यक्रम यशस्वी केला, जनतेने आपले योगदान दिले, ज्यातून पूर्ण देशात आपल्या जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे असे कौतुक करत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स