ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्ह्यातील माजी सैनिक कालवश ; भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी केला शोक व्यक्त..!

जिल्ह्यातील माजी सैनिक कालवश ; भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी केला शोक व्यक्त..!

प्रकाशन: 26 Nov 2023 02:27 PM
वाचन संख्या 97

प्रतिनिधी तालुका कणकवली येथील नाटळ गावचे रहिवासी माजी सैनिक डॉ.बी आर खरात यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी निधन. त्यांच्या मूळ गावी नाटळ येथे सायंकाळी 5.00 वाजता त्यांच्यावर ती अंत्यसंस्कार होणार आहेत. भारतीय सेना दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वैभववाडी व कणकवली येथे आपले स्वतःचे क्लिनिक चालवले सर्वत्र त्यांना डॉक्टर खरात म्हणून ओळखले जात होते. सामाजिक चळवळीत देखील त्यांनी घेतलेला सहभाग समाजासाठी प्रेरणादायी होता.समाजाला उन्नती कडे नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. 1986 ते 1987 च्या सुमारास डॉक्टर बी आर खरात आणि सीताराम बोडके बि एन वराक त्यांच्या सारख्या असंख्य सहकारी यांच्या सोबतघेऊन सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजसेवा संघाची अधिकृत नोंदणी करून खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजसेवेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यावेळी रस्ते नसताना प्रत्येक वाडीवस्तीवर पायपीट करीत जाऊन लोकांच्या मीटिंग घेणे, लोकांना समाजसेवेचे महत्त्व पटवून सांगणे,त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन अतिशय दुर्गम भागात शाळा, पाणी , लाईट ची व्यवस्था करण्यासाठी अहोरात्र धडपड करणाऱ्यांपैकी एक प्रकारे व्यक्तिमत्व डॉक्टर बी आर खरात यांनी सकाळी 05.00 वाजताच्या सुमारास डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल कणकवली येथे उपचार घेत असताना शेवटचा श्वास घेतला.

भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे आणि प्रभारी बाळा गोसावी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स