बांदा मराठा समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन ; जरांगेच्या सभेच्या नियोजनाबाबत होणार चर्चा.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदा मराठा समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन मंगळवारी २१ रोजी दुपारी ३ वाजता बांदा विकास सोसायटीच्या सभागृहात करण्यात आले आहे. या सभेत मराठा समाजाची कार्यकारिणी निवड, वार्षिक कार्यक्रमांचा लेखा जोखा, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कुडाळ येथे होणाऱ्या सभेचे नियोजन, समाजातील बांधवांसाठी राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, आरोग्य विषयक, सामाजिक उपक्रम तसेच मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी भविष्यातील निर्णय याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.
या सभेसाठी शहरातील मराठा समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, सचिव म. गो. सावंत यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)