ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांची आश्वासनपूर्ती ; मसुरे कावावाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांची आश्वासनपूर्ती ; मसुरे कावावाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन.

प्रकाशन: 18 Nov 2023 10:44 AM
वाचन संख्या 134

मसुरे गांव हा राणे परिवाराचा आवडता गांव असल्याचीही निलेश राणे यांनी केली प्रशंसा..!

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि माजी खासदार भाजप नेते निलेश राणे यांच्या सहकार्यातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजुरी मिळालेल्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ भाजप नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मसुरे कावावाडी येथील ग्रामस्थांच्या मागणी नुसार या रस्त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गेली कित्येक वर्षाची या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणाची येथील ग्रामस्थांची मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार निलेश राणे आणि भारतीय जनता पक्षाने पूर्ण केल्याने कावावाडी ग्रामस्थांनी या सर्वांचे आभार मानले आहेत. यावेळी निलेश राणे बोलताना म्हणाले, मसुरे गांव हा राणे परिवाराचा आवडता गांव असून येथील विकासात्मक सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा आमचा मानस राहील. येथील उर्वरित रस्त्याचे सुद्धा काम लवकरच पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल आणि उर्वरित रस्ताही पूर्ण करून दिला जाईल. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, छोटू ठाकूर, सरोज परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, निलेश खोत, उधोजक दया देसाई, जीवन मूणगेकर, वेरली सरपंच धनंजय परब, प्रेरणा येसजी, वासुदेव पाटील, अनंत भोगले, पुरुषोत्तम शिंगरे, सतीश मसूरकर, भंडारी समाज अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर, तात्या हिंदळेकर, बाबू येसजी, दीपक हिंदळेकर, किरण पेडणेकर, सतीश मसुरकर, किरण पाटील, बंटी मुणगेकर, देवानंद कांबळी, बाबुराव गोलतकर, बंड्या करंजेकर, रघु राऊत, बाळू मालवणकर, ओमकार हडकर, अरुण गिरकर, विष्णू गिरकर, मोहन मसुरकर, विश्वास मसुरकर, अरुण आंबेरकर, सागर पाटील आणि कावावाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मसुरे कावावाडी भंडारी समाजसेवा संघाच्या वतीने दीपक हिंदळेकर यांनी निलेश राणे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ मसुरकर यांनी करून मसरे कावावाडीतील विविध विकास कामे आणि पर्यटनातून गावाचा विकास याबाबत माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरोज परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स