ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची साहित्यिक वैशाली पंडित यांनी घेतली सदिच्छा भेट.

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची साहित्यिक वैशाली पंडित यांनी घेतली सदिच्छा भेट.

प्रकाशन: 17 Nov 2023 10:31 AM
वाचन संख्या 265

देवेंद्र गावडे | उपसंपादक : महाराष्ट्रातील प्रतिथयश ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसे यांची आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या मार्गदर्शक व साहित्यिक वैशाली पंडित यांनी काल १६ नोव्हेंबरला सदिच्छा भेट घेतली. मुंबई मध्ये भाऊबिजेचे औचित्य साधून श्री. भाऊ तोरसेकर यांच्या निवासस्थानी झालेली ही एका तासाची सदिच्छा भेट घेतली गेल्याचे समजते.

या भेटी दरम्यान श्री. भाऊ तोरसेकर यांच्याशी पत्रकारिता, राजकारण व इतर सामाजिक मुद्द्यांवर अनौपचारिक चर्चा झाली. यावेळी श्री भाऊ तोरसेकर यांनी यु ट्यूबवरुन ते करत असलेले पत्रकारिता विश्लेषण हे घाटातील सावधगिरीच्या फलकांप्रमाणे करतात असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वैशाली पंडित यांच्या समवेत वित्त अभ्यासक श्री वसंत थोरात तसेच माजी दूरसंचार अधिकारी सौ. वृंदा थोरात उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स