हिंदुह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छता मोहिम ; कणकवलीतील श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळाचा उपक्रम.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळाच्या माध्यमातून हिंदुह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त
आज शुक्रवारी १७ नोव्हेंबरला त्यांना श्रध्दांजली अर्पण करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला जाणार आहे.
श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर ( संस्थापक, माऊली मित्रमंडळ.)
माऊली मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांना, आम्ही आवाहन करतो, की आज दिनांक १७/११/२०२३ रोजी सकाळी ठिक १२ वाजता, नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे एकत्रित व्हावे असे आवाहन श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले आहे. उड्डाण पुलाच्या खाली असणारा अस्वच्छ परिसर संपूर्ण पणे स्वच्छ करण्याचा उद्देश ठेवून हे अभियान राबवले जाणार आहे, तरी स्थानिक बंधू भगिनींनो आपण सर्वांनी च उपस्थित रहावे असे आवाहन राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर, कणकवली यांना ९५०३००५१६३, ९४२२३५४९१८ या क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकणार आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)