ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी का घेतलाय यु - टर्न..?
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी का घेतलाय यु - टर्न..?

प्रकाशन: 17 Nov 2023 06:54 AM
वाचन संख्या 327

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मित्रमंडळाचे संस्थापक व समाजसेवक श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कणकवलीत उड्डाणपुलाचे ‘आप्पासाहेब पटवर्धन उड्डाणपुल’असे नामकरण करायच्या विषयावर त्यांची नवीन भूमिका स्पष्ट करत यु – टर्न घेतला आहे. माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी संदेश पत्राद्वारे श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणाले की जर सध्याच्या परिस्थितीत उड्डाणपुलाला सन्माननीय आप्पासाहेब पटवर्धन यांचे नांव दिले आणि काही जर गड नदी ते जानवली या पुलाचे बरेवाईट घडले तर ते आम्हाला सहन होणार नाही. आजच्या घडिला या उड्डाण पुलाची निकृष्ट अवस्था व निकृष्ट काम पहाता तो कधी कोसळेल ही बीती कोणीही नाकारू शकत नाही, आणि जर हे पुल वाहतूक व्यवस्था सुरू असताना कोसळले तर याची जबाबदारी कोण घेणार असाही सवाल श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केला आहे. आणि समजा कोणी जबाबदारी घेतली पण या दुर्घटनेत काही जिवितहानी झाली तर त्या दुःखद भावनेला जबाबदार कोण असेल अशीही त्यांनी विचारणा केली आहे. वर्क ऑर्डर निघाली आहे ना, मग काम का नाही सुरू केले यावरही उत्तर द्यावे असे आवाहन श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी संबंधित शासकीय व प्रशासकीय यंत्रणांना केले आहे. सर्विस रोड वरुन ये जा करणारे मेल्यावर कामं होणार का त्यापेक्षा आम्हाला उत्तर नकोच तर कृती हवी आहे. संपूर्ण पणे वाय टाकून नविन उड्डाण पूल बनवावा, अन्यथा समस्त कणकवली करांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा सामाजिक इशाराही यादरम्यान श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दिला आहे.

त्या गड नदीच्या ठिकाणी आजपर्यंत कित्येक गाड्या आडव्या झाल्या, तरीही कोणी याचा साधी माणुसकी म्हणून विचार करू शकत नाही हे आश्चर्यजनक असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले असून आता या विषयावर बोलावे तेवढे कमी च आहे. आज पर्यंत सर्वच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आंदोलने केली, विविध राजकीय पक्षांनी सुध्दा हजारो पर्यंत केलेत, हे नाकारुन चालणार नाही असेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

आता आमची कणकवली व जिल्हा वासियांची एकच कळकळीची मागणी आहे की उड्डाण पूल संपूर्ण पणे नवीन व्हावे व नंतरच तो वापरात येऊन कणकवलीतील उड्डाणपुलाला सन्माननीय आप्पासाहेब पटवर्धन यांचे नांव देण्यात यावे अशी आमची शासन व प्रशासनाकडे ठाम मागणी राहील असे श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स