ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नेरूर गोंधयाळे येथे सुसज्ज व्यायामशाळेचे झाले लोकार्पण.

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नेरूर गोंधयाळे येथे सुसज्ज व्यायामशाळेचे झाले लोकार्पण.

प्रकाशन: 15 Nov 2023 05:03 AM
वाचन संख्या 124

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर गोंधयाळे येथे अद्ययावत अशी व्यायामशाळा उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण रविवारी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. भवानी मित्रमंडळाने आ. वैभव नाईक यांच्याकडे व्यायामशाळेसाठी मागणी केली होती. आ. वैभव नाईक यांनी सुदृढ आरोग्यासाठीची ही मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे, कुडाळ नगरसेवक उदय मांजरेकर, सरपंच भक्ती घाडी,उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, माजी उपसरपंच समद मुजावर,युवासेना उपतालुका प्रमुख विनय गावडे, राजू गवंडे, अमित राणे, माजी उपसरपंच सुनील गावडे,ग्रा. प. सदस्य प्रभाकर गावडे, निकिता सडवेलकर, अरुणा चव्हाण, प्रवीण नेरुरकर, संतोष कुडाळकर, रुचा पावसकर, भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष धोंडी कांबळी,काका गावडे, प्रसाद गावडे, शरद मसुरकर,रामा कांबळी, अजित मार्गी, गणेश गावडे, दादा चव्हाण, बाबल गावडे, जगन्नाथ गावडे आदींसह नेरूर ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स