पळसंबची ग्रामदेवता श्री जयंतीदेवी चरणी भाविक भक्त श्री. संदीप साटम यांनी दोन स्टॅन्डिंग पंखे व श्री. रोशन चिंचवलकर यांनी ५ ग्रॅम चांदीचे नाणे केले अर्पण..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवची ग्रामदेवता श्री जयंतीदेवी चरणी दोन भक्तांनी नुकतीच देणगी दिली आहे.
भाविक भक्त श्री संदीप साटम यांनी ८,८०० रुपयांचे ओरीअंट कंपनीचे दोन स्टॅन्डिंग पंखे अर्पण केले असून भाविक भक्त श्री रोशन चिंचवलकर यांनी ५ ग्रॅम चांदीचे नाणे अर्पण केले आहे.
श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, पळसंब यांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)