ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
नेरूर येथील नेत्रतपासणी शिबिराद्वारे १२५ ग्रामस्थांची नेत्रतपासणी व मोफत चष्मा वाटप ; आरोग्य व ऑनलाईन सुविधा शिबिराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नेरूर येथील नेत्रतपासणी शिबिराद्वारे १२५ ग्रामस्थांची नेत्रतपासणी व मोफत चष्मा वाटप ; आरोग्य व ऑनलाईन सुविधा शिबिराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 13 Nov 2023 02:20 PM
वाचन संख्या 228

कुडाळ । देवेंद्र गावडे  (उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायत नेरुर देऊळवाडा, श्री देव कलेश्वर देवस्थान उपसमिती नेरुर व रिक्षा युनियन नेरुर चव्हाटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‍११ नोव्हेंबरला शनिवारी मोफत नेत्र तपासणी  शिबीर उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. या शिबीरात गांवातील एकुण १८० ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी मध्ये २७ ग्रामस्थांच्या डोळ्यांत मोती बिंदू असल्याचे निदान करण्यात आले आणि त्यांची मोती  बिंदू शस्त्रक्रिया मोफत करुन देण्यात येणार आहे. १२५ ग्रामस्थांना मोफत चष्मा वाटप, बी.पी. व शुगर मोफत तपासणी करण्यात आली आहे.

ऑनलाईन सुविधा शिबिराच्या माध्यमातून आधार कार्ड, आयुष्मान कार्ड काढणे, आधार कार्ड मोबाईल लिंक व अपडेट करणे याचा गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

शिबीर कार्यक्रमास सरपंच सौ.भक्ती निलेश घाडीगांवकर, उपसरपंच श्री. दत्ताराम शांताराम म्हाडदळकर, देवस्थान ‍समिती अध्यक्ष श्री. प्रदीप जयराम नाईक, सदस्य श्री. चारुदत्त देसाई, श्री. शेखर गावडे, श्री. निलेश मेस्त्री व श्री. निळकंठ नेरुरकर तसेच रिक्षा युनियन अध्यक्ष श्री.गुरु साऊळ व सदस्य व ग्रा. पं. सर्व सदस्य तसेच तंटामुक्त समिती अध्यक्षा सौ.लक्ष्मी बापू सडवेलकर, पो. पाटील श्री. गणपत ‍गोविंद मेस्त्री, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व आशा स्वयंसेविका, सर्व अंगणवाडी  सेविका, सर्व सी. आर. पी.  उपस्थित होते.

नेरूर ग्रामस्थांनी या बहुउद्देशीय शिबिराबद्दल समाधान व्यक्त करुन आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स