ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली विद्यामंदिरच्या मुलांनी दिवीजा आश्रमातील ज्येष्ठांसोबत साजरी केली प्रदूषणमुक्त दिवाळी ; उपक्रमाची होत आहे प्रशंसा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली विद्यामंदिरच्या मुलांनी दिवीजा आश्रमातील ज्येष्ठांसोबत साजरी केली प्रदूषणमुक्त दिवाळी ; उपक्रमाची होत आहे प्रशंसा.

प्रकाशन: 13 Nov 2023 02:54 PM
वाचन संख्या 106

कासार्डे | निकेत पावसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वस्तिक फाऊंडेशनच्या असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात भेट देउन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली. विद्यामंदिर शाळेतील शिक्षक प्रसाद राणे व शिक्षिका सौं. शर्मिष्ठा केळुस्कर यांनी विद्याथ्यांना दिविजा वृद्धाश्रमात नेंउन प्रदूषण मुक्त दिवाळी हा उपक्रम राबविला.

या उपक्रमानिमित्त या विद्यार्थ्यांनी या वृध्दाश्रमातील आजी आजोबासाठी भेट कार्ड बनवून आणली, काही विद्यार्थीनी गीते सादर केली तर काहींनी फराळ व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. यावेळी प्रसाद राणे यांनी आश्रम संकल्पना काय असतें ह्या विषयी माहिती विद्यार्थीना दिली. विद्यार्थी व शिक्षकांनी आजी आजोबांचे पाद्य पुजन्न करून ओवाळनी केली. एक उत्तम संस्कार शिक्षकांनी या विद्यार्थ्याना यानिमित्ताने आश्रमात शिकवला. तर यावेळी दिविजा वृद्धाश्रमाच्या संचालकांनी आश्रमाची माहिती विद्यार्थीना दिली.

आजी आजोबांना नातवंडे भेटायला आल्यामुळे खूप भारावून गेले. विद्यामंदिर शाळेने प्रदूषणमुक्त दिवाळी हा राबावलेला उपक्रम प्रशंसनीय आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित सर्वांनी तसेच आजी आजोबांनी दिली. यावेळी शाळेचे प्रसाद राणे, सौ. शर्मिला केळुसकर, विद्या शिरसाट, श्रीमती आर. आर. कदम, श्रद्धा लिमये, कर्मचारी अरुण इंगळे आणि पालक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स