एस.टी.बसच्या कुडाळ - निवतीबंदर शालेय फे-या पूर्ववत करा!
वेंगुर्ले | ब्युरो न्यूज : शाळा सुरू हाेऊन एक आठवडा उलटून गेला तरी
काेराेना काळात एस्.टी.च्या बंद केलेल्या कुडाळ-निवतीबंदर
शालेय फे-या अद्याप सुरू झाल्या नाही आहेत.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे
हाल हाेत आहेत. तरी कुडाळ येथून सकाळी ७-३०वाजता व
दुपारी २-२०वाजता सुटणा-या
कुडाळ-निवतीबंदर या दाेन्ही गाड्या तात्काळ सुरू कराव्यात,तसेच वस्तीच्या गाडीची निवती
येथून सुटण्याची ७-१० ही वेळ बदलून ती पूर्ववत ६-३० करण्याची मागणी विद्यार्थी व पालकानी केली आहे.तशा आशयाचे निवेदन सरपंच,ग्रा.पं.मेढा यांनी दिले आहे. कुडाळ आगाराने तातडीने दखल घेण्याची मागणी प्रवासी व विध्यार्थी यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)