ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई यशस्वी सायकलिंग ; १८ दिवसांत २०५६ कि मी अंतर केले पार..!

रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई यशस्वी सायकलिंग ; १८ दिवसांत २०५६ कि मी अंतर केले पार..!

प्रकाशन: 11 Nov 2023 09:15 AM
वाचन संख्या 265

ब्यूटीज ऑन व्हिल्स समूहाने केली अभिनंदन प्रशंसा.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग मधील मालवण तालुक्यातील चौके गांवचे सुपुत्र रमेश गावडे यांनी जम्मू काटरा ते मुंबई हा २०५६ किमी प्रवास १८ दिवस सायकलिंग करत नुकताच पूर्ण केला आहे. इन्कमटॅक्स अधिकारी असलेल्या गावडे यांच्या या कामगिरीची विशेष प्रशंसा होत आहे.

आरोग्यविषयक व स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी अशा पद्धतीने आपण मोहीम राबवत असल्याचे श्री गावडे यांनी सांगितले. यापूर्वीही गावडे यांनी मु़बंई ते मालवण नंतर मुंबई ते कन्याकुमारी असे यापूर्वी सायकलिंग केले आहे. रनिंग मध्ये हाफ व फुल मॅरेथॉन सुध्दा तेवढ्याच ताकदीने पूर्ण केली आहे. सिंधुदुर्ग मधील सायकलिंग आणि रनिंग इव्हेंट मध्ये सुद्धा ते भाग घेतात. गावडे यांच्या या कामगिरीबद्दल ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स