ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
नवरात्रीच्या निमित्ताने चित्रकार अक्षय मेस्त्रींनी      साकारली देवीची अठरा रुपे.....!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नवरात्रीच्या निमित्ताने चित्रकार अक्षय मेस्त्रींनी साकारली देवीची अठरा रुपे.....!

प्रकाशन: 12 Oct 2021 07:53 PM
वाचन संख्या 39

कणकवली | उमेश परब : गवाणे या गावातील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीची वेगवेगळी अठरा रूपे साकारली आहेत. आपल्या देशात असामान्य आणि कर्तुत्व गाजवणाऱ्या जगात वेगळा ठसा उमटविलेल्या नऊ कर्तृत्ववान महिलांचे रूप साकारून वेगळ्याच पद्धतीने नवरात्रीत महिलाशक्तीचा जागर केला. युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने 4×15 फूट आकाराच्या कॅनव्हासवर अँक्रेलिक कलरने देवीची नऊ रुपे साकारलीत यामध्ये देवीची नऊ रूपे आहेत आणि आधुनिक कर्तुत्ववान नऊ स्त्रियायांचे रेखाटन केले आहे.

यामध्ये सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, अंबाबाई, काली, सीता, राधा, रुक्मिणी, दुर्गा तर आधुनिक कर्तृत्ववान स्त्रिया सिंधुताई सपकाळ, पी. व्ही. सिंधू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, आनंदी गोपाळ जोशी, लता मंगेशकर, सावित्रीबाई फुले, मादाम कामा, मदर तेरेसा, यांचा समावेश आहे. ही सर्व चित्रे युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने गवाने येथील घरी प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. ही सर्व चित्रे साकारायला त्याला सुमारे http://localhost/news/public/uploads/20 ते 25 दिवसांचा कालावधी लागला. अशा सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी अक्षयने नऊ महिलांचे चित्र साकारले आहे. यातून देशाच्या तरुण पिढीने आदर्श घ्यावा हिच त्याची संकल्पना असल्याचे अक्षय मेस्त्री यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स