ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पोईपमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सत्यनारायण महापूजा आणि डबलबारीचे आयोजन..!

पोईपमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सत्यनारायण महापूजा आणि डबलबारीचे आयोजन..!

प्रकाशन: 12 Oct 2021 07:24 PM
वाचन संख्या 31

पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांचा उपक्रम…

तिरंगा भजनबारीचा आमनेसामनेचा सामनाही आणणार रंगत..!

पोईप | ओंकार चव्हाण : पोईप येथील आदर्श रिक्षा मंडळ व ग्रामस्थ पोईप यांच्यातर्फे येत्या 19 ऑक्टोबरला कोजागिरीपोर्णिमेनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
याचेच औचित्य साधून आयोजकांतर्फे भजनांची तिरंगी लढत तथा तिरंगा भजनबारीचा जंगी सामनादेखील आयोजित केला आहे.
कुडाळ येथील प्रसिद्ध बुवा श्री.गुंडू सावंत विरुद्ध मुंबई  सांताक्रूझचे स्टार बुवा श्री.श्रीकांत शिरसाट आणि कुडाळचे लोकप्रीय श्री.अरुण घाडी बुवा या तिघांत रंगणारा हा सामना म्हणजे पोईप व परिसरांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील भजनप्रेमींसाठी एक आगळी वेगळी पर्वणीच आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आदर्श रिक्षा मंडळाचे सदस्य व पोईप ग्रामस्थ सर्वतोपरी मेहनत घेत आहेत.
महापूजेच्या कार्यक्रमांना तमाम लोकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेत डबलबारीचीही रंगत अनुभवावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स