ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आडेली येथे नेत्र तपासणी शिबिर आणि महिला बचतगटांचा सत्कार ; श्री सोमेश्वर कलामंच द्वारा आयोजित गराजलो रे गराजलो एक चळवळ यांचा विशेष  सहभाग.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आडेली येथे नेत्र तपासणी शिबिर आणि महिला बचतगटांचा सत्कार ; श्री सोमेश्वर कलामंच द्वारा आयोजित गराजलो रे गराजलो एक चळवळ यांचा विशेष सहभाग.

प्रकाशन: 08 Nov 2023 08:20 PM
वाचन संख्या 211

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या आडेली येथे श्री सोमेश्वर महिला ग्राम संघ आणि जिजाऊ महिला ग्राम संघ यांच्या सौजन्याने ७ नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध सामाजिक संस्था श्री सोमेश्वर कलामंच द्वारा आयोजित गराजलो रे गराजलो एक चळवळ द्वारे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या दरम्यानच महिला बचतगटांचा प्रोत्साहन व सक्षमीकरणासाठी महिला बचतगटांचा सुपारी रोप, गुलाब पुष्पं आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांचेही शाल, पुष्पगुच्छ, सुपारी रोप देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो एक चळवळीचे प्रणेते व सर्वेसर्वा श्री सहदेव धर्णे यांनी आपली संस्था ही नेहमीच निस्वार्थीपणे समाजहितासाठी निःस्वार्थीपणे कार्य करीत राहणार असल्याचे प्रतिपादन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स