हळवल ग्राम तंटामुक्ती अध्यक्षपदी उमेश परब बिनविरोध...!
कणकवली | ब्युरो न्यूज : हळवल गांव तंटामुक्ती अध्यक्षपदी पत्रकार व आपली सिंधुनगरी चॅनेलचे धडाडीचे प्रतिनिधी श्री. उमेश परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी तंटामुक्ती अध्यक्षांचा कार्यकाल संपल्यानंतर हळवल ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उमेश परब यांची निवड करण्यात आली. हळवल ग्रामसेवक यांनी नूतन अध्यक्ष निवडीबाबत कोणी इच्छुक असल्याचे विचारले असता उमेश परब व विकास तावडे हे दोन उमेदवार इच्छुक असल्याचे दिसून आले. त्यानंतर विकास तावडे यांनी माघार घेत उमेश परब यांना पसंती दर्शविली अखेर सर्वानुमते उमेश परब यांची हळवल तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी उमेश परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उमेश परब हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून नुकताच त्यांना लिंगेश्वर कला क्रीडा मंडळ हळवल यांचा समाज मित्र व महापुरुष मित्रमंडळ कळसुली यांचा समाजप्रेमी हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. उमेश परब यांची सामाजिक कामात असलेली आवड लक्षात घेता ते तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी योग्य असल्याचा निर्वाळा उपस्थित ग्रामस्थांनी दिला. यावेळी आपण गावात योग्य प्रकारचे काम करून गावाला नावलौकिक मिळवून देऊ असा विश्वास उमेश परब यांनी व्यक्त केला उमेश परब यांची हळवल तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड होताच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)