ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अभिनेत्री अक्षता कांबळी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.

अभिनेत्री अक्षता कांबळी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.

प्रकाशन: 01 Nov 2023 08:11 AM
वाचन संख्या 200

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येथील कणकवली येथील अभिनेत्री व समाजसेविका सौ. अक्षता कांबळी यांना ‘आधार सामाजिक सेवा संस्था, महाराष्ट्र’ यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कराड येथील यशवंत राव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २९ ऑक्टोबरला हा सन्मान प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त ह. भ .प . डॉ सौ मनीषा ताई गुरव (नाडी तज्ञा) व आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिनेश मेटकरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गेली पंधरा वर्षे आपल्या अभिनय क्षेत्राबरोबर समाज सेवा जोपासणाऱ्या अक्षता ताई यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे. या वेळी आधार सेवा समिती चे अध्यक्ष श्री दिनेश मेटकरी , कराड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अमीर मुलागी , कराड शहर पालिस उपनिरीक्षक सौ. रेखा देशपांडे, अभिनेते बलराज माने , अभिनेते गौरव भोसले, अभिनेता निर्माता आदित्यराजे मराठे , अभिनेत्री ऐश्वर्या धौड, अभिनेत्री श्रुतिका सावंत, संभाजी ब्रिगेड चित्रपट संस्था पुणे अध्यक्ष प्रकाश धिंडले दिग्दर्शक व्यंकटेश कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स