ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांच्या वतीने कँडल मार्च ; मनोज जरांगे पाटील यांना दर्शविला पाठिंबा.

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांच्या वतीने कँडल मार्च ; मनोज जरांगे पाटील यांना दर्शविला पाठिंबा.

प्रकाशन: 01 Nov 2023 02:36 AM
वाचन संख्या 101

कणकवली | प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण छेडत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी काल ३१ ऑक्टोबरला कणकवलीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा समाज बांधवांच्या वतीने मेणबत्त्या पेटवून कँडल मार्च काढण्यात आला.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत आता पर्यंत ज्यांनी आरक्षणासाठी आहुती दिली त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या कँडल मार्चमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाचे नेते एस टी सावंत, जिल्हा बँकेचे संचालक व युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, सोमा गायकवाड, रामदास विखाळे, सचिन सावंत, रिमेश चव्हाण, राजू राणे, योगेश सावंत, उद्योजक सतीश नाईक, संदीप राणे, दामू सावंत, संतोष परब, महेंद्र सांबरेकर, लवु वारंग, अनंत राणे, रुपेश आमडोसकर,अनुप वारंग, अजय सावंत, भाई साटम,औदुंबर राणे, सखाराम सपकाळ, अभिजीत सावंत, तेजस राणे, मंगेश सावंत, प्रमोद कावले आदी मराठा बांधव उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स