मुणगे आपईवाडी येथील श्रीमती सुनीता महाजन यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे आपईवाडी येथील श्रीमती सुनिता परमानंद महाजन यांचे शुक्रवारी २७ ऑक्टोबरला राहत्या घरी निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मुणगे येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. मुणगे ज्युनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक प्रणय महाजन तसेच सारस्वत बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी किशोर महाजन यांच्या त्या आई होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)