हुसेन लांजेकर यांना राष्ट्रीय आदर्श उद्योगरत्न गौरव पुरस्कार प्रदान.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण.
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांना राष्ट्रीय आदर्श उद्योगरत्न गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्काराचे वितरण कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. पुरस्कार वितरण सोहळा बेळगांव येथे संपन्न झाला. युवा नेते हुसेन लांजेकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. दिल्ली, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र राज्य मधून निवडक व्यक्तींची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. राजकीय, उद्योग, क्रीडा व शासकीय अधिकारी या क्षेत्रातील व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, कर्नाटक खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख बिदर महेश मेघनार, राजू शिंगाडे, अरविंद घट्टी व अधिकारी उपस्थित होते.
पुरस्काराचे मानकरी हुसेन लांजेकर यांना विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, म्हैसूरी फेटा, चंदनाचा हार व भारत सरकार केंद्रीय मंत्री यांचे अभिनंदन पत्र देऊन गौरविण्यात आले. हुसेन लांजेकर हे कोळपे गांवचे रहिवासी आहे. मुस्लिम समाजाचा प्रामाणिक कार्यकर्ता अशी ओळख त्यांची संपूर्ण जिल्ह्यात आहे. अनेक वर्ष ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदावर ते सध्या कार्यरत आहेत, जिल्हा मुस्लिम संघटनेत देखील त्यांचे फार मोठे योगदान आहे. कोळपे गांवच्या विकासासाठी ते कार्यरत असतात. पंचवीस वर्ष सामाजिक व राजकीय चळवळीत स्वतःला झोकून घेत काम करणाऱ्या हुसेन लांजेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, मुस्लिम संघटना, वैभववाडी तालुक्यातील नागरिक यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)