स्वच्छता सर्वेक्षणाबद्दल 20 ऑक्टोबर पूर्वी मत नोंदवावे : जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत.
राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्याचा जि प अध्यक्ष सौ.संजना सावंत यांचा मानस..
ओरोस | प्रतिनिधी : जिल्हा स्वच्छता विषयक स्पर्धेत सातत्याने राज्यात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने का छाप कायम राखली आहे. त्यामुळे स्वच्छता विषयक सर्वेक्षणात देखील जिल्ह्यातील नागरिकानी ‘ssg http://localhost/news/public/uploads/2021’ हे एप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील स्वच्छता विषयक बाबींच्या प्रतिक्रिया नोंद करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत स्वच्छता विषयक सर्वेक्षणात अहमद नगर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून सिंधुदुर्ग जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे.
दिनांक http://localhost/news/public/uploads/20 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 पर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात स्वच्छताविषयक सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले मत अवश्य नोंदवावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)