ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोणापाल नवरात्रोत्सवात खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सौ. स्नेहल गावडे पैठणीच्या विजेत्या ; प्रशांत प्रकाश गावडे व सुधीन मोहन गावडे पुरस्कृत खेळ पैठणीचा कार्यक्रम.

रोणापाल नवरात्रोत्सवात खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सौ. स्नेहल गावडे पैठणीच्या विजेत्या ; प्रशांत प्रकाश गावडे व सुधीन मोहन गावडे पुरस्कृत खेळ पैठणीचा कार्यक्रम.

प्रकाशन: 27 Oct 2023 04:20 PM
वाचन संख्या 111

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल येथील देवी माऊली मंदिर येथे नवरात्रोउत्सव निमित्ताने श्री प्रशांत प्रकाश गावडे व श्री.सुधीन मोहन गावडे पुरस्कृत खेळ पैठणीचा हा स्पर्धात्मक कार्यक्रम संपन्न झाला. यात सौ स्नेहल विनोद गावडे या विजेत्या ठरल्या तर द्वितीय क्रमांक सौ दीक्षा दीपक परब, तृतीय क्रमांक अनादी अजय गावडे यांना प्राप्त झाला. या कार्यक्रमात एकूण ४० महिलांनी सहभाग घेतला होता. सदर या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन तथा निवेदन श्री कळगुटकर यांनी केले.

विजेत्या तिन्ही क्रमांकांना आकर्षक ट्रॉफी व बक्षीस देण्यात आलः. यावेळी कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर प्रकाश गावडे सुधीन गावडे तानाजी गावडे, उपसरपंच रोणापाल कृष्णा परब ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, ग्रामपंचायत सदस्या सौ. निकिता शेकडे ग्रामपंचायत सदस्या सौ. उज्वला गावडे ग्रामपंचायत सदस्या सौ.उज्वला देऊलकर सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार बाबल तुयेकर, सहसचिव मंगेश गावडे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स