ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या व्ही. एन. नाबर प्रशालेचे प्रि. प्रायमरी स्कूल चे वर्ग सध्या आहेत तेथेच सुरु राहतील : चेअरमन मंगेश कामत.

कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या व्ही. एन. नाबर प्रशालेचे प्रि. प्रायमरी स्कूल चे वर्ग सध्या आहेत तेथेच सुरु राहतील : चेअरमन मंगेश कामत.

प्रकाशन: 27 Oct 2023 04:07 PM
वाचन संख्या 72

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या व्ही. एन. नाबर प्रशालेचे प्रि प्रायमरी वर्ग सध्या आहेत तेथेच सुरु राहतील. पालकांच्या आग्रही मागणीवरुन शिक्षण प्रसारक मंडळ बांदाच्या अध्यक्षांकडे १ नोव्हेंबर रोजी चावी सुपूर्द करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित केल्याची माहिती कामत चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मंगेश कामत यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची ४ वर्गखोल्यांची इमारत भाडेकराराने शिक्षण प्रसारक मंडळाकडे दिलेली आहे. ह्या इमारतीत कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेचे प्रि प्रायमरी वर्ग सुरु आहेत. ही जि. प. अखत्यारीतील इमारत बांदा केंद्रशाळेला मिळावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळा बंद आंदोलन छेडले होते. मात्र या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी भूमिका घेऊन माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाला विरोध केला. यामुळे पालक व माजी विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर चेअरमन मंगेश कामत यांनी १ नोव्हेंबर रोजी सदर इमारतीची चावी एसपीएम संस्थेच्या अध्यक्षांकडे देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांनी तातडीने चेअरमन मंगेश कामत यांची बुधवारी भेट घेतली. मुलांची मानसिकता व पर्यायाने त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, प्रवास खर्च यावर चर्चा झाली.

यावेळी पालक हुसेन मक़ानदार, सुनील राऊळ, अभिजित देसाई, आदिती घोगळे, जान्हवी सावंत, सोनाली धुरी आदी उपस्थित होते. यावेळी पालकांनी अचानक शाळा बदलल्यास मुलांवर होणारे परिणाम व अन्य समस्या मांडल्या. चावी सुपूर्द करण्याचा निर्णय बदलण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. त्यानुसार सध्या सुरु असलेले वर्ग आहेत तेथेच नियमित सुरु राहतील असे चेअरमन कामत यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स