ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उद्या 'चलो रत्नागिरी' ; रिक्षा चालक - मालक एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

उद्या 'चलो रत्नागिरी' ; रिक्षा चालक - मालक एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक.

प्रकाशन: 27 Oct 2023 05:10 PM
वाचन संख्या 296

मालवण | सुयोग पंडित : राजकारण विरहीत रिक्षा चालक- मालक यांच्या समृद्धी साठी व न्याय हक्कासाठी लढण्यासाठी उद्या २८ ऑक्टोबरला रत्नागिरीत १०:३० वाजता चर्चासत्र आयोजीत करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रिक्षा चालक मालक कृती समिती पुणेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक – मालक प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या प्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

“राजकारण विरहित रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्रित लढा उभारुया आणि रिक्षाचालकांना समृद्ध बनवूया” अशा संकल्पनेवर संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड, जिल्ह्यांमधे येणाऱ्या काळात मुक्त रिक्षा परवाना वाटपासह दुचाकी टॅक्सी परवाना तसेच ई रिक्षा विना परमिट देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. तसेच शासनाने बदललेल्या धोरणामुळे रिक्षा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. आपल्या कुटुंबाच्या उपजिविकेसह मुलांचे शिक्षण वैद्यकीय खर्च व इतर खर्च करते वेळी शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्राच्या काही भागात रिक्षा व्यावसाय ठप्प झाल्याने कर्जबाजारी होवून काही रिक्षाचालकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. यामधे काही रिक्षाचालक मृत्युमुखी देखील पडले आहेत. परिवहन विभाग व पोलिस प्रशासन यांच्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण होत चालले आहे. या जुलूमशाही विरोधात जन आंदोलन करुन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी उद्या रत्नागिरीतील आयोजित चर्चा सत्रात जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रिक्षा चालक मालक कृती समिती पुणेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालकाचे प्रतिनिधि उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

या चर्चा सत्रात श्री. नितीन पवार (सरचिटणीस रिक्षा चालक मालक कृती समिती पुणे.), श्री. संतोष भि. नाईक (कार्याध्यक्ष -कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ.), श्री. सुधिर पराडकर (सहसचिव- कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

श्री.प्रताप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा रिक्षा चालक मालक असोसिएशन – रत्नागिरी.), श्री. दिलीप खेतले (अध्यक्ष- रिक्षा चालक-मालक संघटना. चिपळूण.), श्री. सुनील भालेकर (अध्यक्ष रिक्षा चालक-मालक संघटना खेड.) श्री. लवू कांबळे (अध्यक्ष रिक्षा चालक-मालक संघटना. लांजा.) श्री.संतोष सातवसे (सचिव, रिक्षा चालक-मालक संघटना राजापूर.) श्री. अशोक वाडेकर (अध्यक्ष स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटना.रत्नागिरी.), तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री राजकुमार तळेकर – कणकवली (तरळे), जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. नागेश ओरसकर (ओरस ), श्री.महेश मयेकर अध्यक्ष रिक्षा चालक मालक संघटना (मालवण), श्री.भरत तळवडेकर कणकवली, श्री.रवि माने कुडाळ तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी व रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दत्त कृपा मंगल कार्यालय, नवीन नगरपरिषद भाजी मार्केट जवळ, रत्नागिरी येथे हे चर्चासत्र आयोजीत करण्यात आले आहे व अधिक माहितीसाठी श्री. प्रताप भाटकर (९७६५३९८९९८) यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक मालक यांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती निमंत्रक श्री प्रताप भाटकर व सहकारी यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स