ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गांगेश्र्वर मित्र मंडळ आयोजित पैठणी स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गांगेश्र्वर मित्र मंडळ आयोजित पैठणी स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

प्रकाशन: 24 Oct 2023 07:35 PM
वाचन संख्या 247

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत, २२ ऑक्टोबरला गांगेश्वर मित्रमंडळ यांच्या तर्फे आयोजीत महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ ही स्पर्धा संपन्न झाली. या सर्धेत ६६ स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेचे नियोजन गांगेश्र्वर मित्रमंडळाच्या वतीने शितल मांजरेकर यांनी केले होते. रंजक खेळ आणि अभिनेते कलाकार निलेश पवार यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. मंडळाचे कार्यकर्ते योगेश जाधव, परेश परब, रामदास मांजरेकर, रोशन जाधव, सागर राणे, राहुल वालावलकर, आर्डेकर, हुलजी , खरात, चांदनी जाधव यांचा नियोजनामध्ये योगदान होते.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक निधी निलेश पाटणे (पैठणी ), द्वितीय पारितोषिक ( पैठणी ) प्रिया दशरथ चव्हाण , तृतीय पारितोषिक अर्चना गावडे ( भेटवस्तू ) यांनी पटकावले . या स्पर्धेचे बक्षीस वितरणस अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी बक्षिसांचे वितरण करण्यात आले. महिलांच्या भरघोस प्रतिसाद, शीतल मांजरेकर यांचे नियोजन आणि गांगेश्र्वर मित्रमंडळाचे उकृष्ठ व्यवस्थापन याचे मालवणी भाषेतून तोंडभरून कौतुक केले. महिलांनी दिलेल्या प्रतिसाद बद्दल शीतल मांजरेकर यांनी सर्व महिलांचे आभार मानले. तसेच अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सन्मानाची ओटी देवून सन्मान करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स