चिंदर येथील श्री. यशवंत शांताराम घाडी उर्फ बाळू बुवा कालवश ; जवळपास २५ वर्षे पोस्ट मास्टर म्हणून बजावली होती सेवा.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गावठवाडी येथील श्री. यशवंत शांताराम घाडी उर्फ बाळू बुवा आज सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अल्पशः आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. चिंदर गावठवाडी उन्नती मंडळाचे जेष्ठ सदस्य आधारस्तभ होते. चिंदर बाजार पोस्ट ऑफीसमध्ये जवळपास २५ वर्षे पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत होते. संपूर्ण परिसरात ते कसलेले भजनी बुवा म्हणूनही प्रसिध्द होते. गावच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात ते क्रियाशिल असत.
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगे सुना पुतणे नातु नातवडे असा परिवार आहे. बाळू बुवा यांच्या निधनाने मालवण तालुक्यातून शोक व्यक्त होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)