श्री. जगन्नाथ केशव मारकड कालवश ; कासार्डेचे क्रीडा शिक्षक व पत्रकार दत्तात्रय मारकड यांचे वडिल होत.
संतोष साळसकर | शिरगांव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व शिक्षक भारती आणि क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हा व राज्य पदाधिकारी पत्रकार श्री. दत्तात्रय मारकड यांचे वडिल जगन्नाथ केशव मारकड (वय -९१) यांचे कांरडेवाडी ता. सांगोला जि. सोलापुर येथे वृध्दापकाळाने शनिवारी २१ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वा राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)