सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा देवगडच्या वतीने जामसंडे येथे 'बॉम्बे ब्लड गृप' शोध मोहीमेचे आयोजन.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड आयोजित ‘बॉम्बे ब्लड गृप शोध मोहीम’ (फक्त ओ +Ve / ओ -Ve रक्तगटाकरिता) विनामूल्य तपासणी दिनांक २९ ऑक्टोबरला सकाळी ९ पासून दुपारी १-३० पर्यंत श्री मोरेश्वर गोगटे हायस्कूल, जामसंडे येथे आयोजित करण्यात आली आहे.
बॉम्बे ब्लड गृप हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट आहे. बॉम्बे ब्लड ग्रुप हा रक्तगट जगाच्या लोकसंख्येपैकी दहा लाखात चार या प्रमाणात (०.०००४) उपलब्ध असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात हा रक्तगट मोठ्या प्रमाणात आढळला आहे. मालवण तालुक्यात राबवलेली शोध मोहीम आणि नंतर मिळालेल्या साखळीनुसार या गटाचे ३ रक्तदात्यांसह एकूण सहा व्यक्ती आपल्याला सापडल्या आहेत. तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल १८ लोकांची नोंद आजपर्यंत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कडे झालेली आहे. मालवण तालुक्याप्रमाणेच बॉम्बे ब्लड गृप या दुर्मिळ गटाची व्यक्ती देवगड तालुक्यातही सापडू शकते या संदर्भात ही चाचणी केली जाणार आहे.
देवगड तालुक्यात अशी विशेष शोध मोहीम करण्याचे प्रयोजन येत्या २९ सप्टेंबर रोजी जामसंडे येथे करण्यात आले आहे. देवगड अथवा अन्य कोणत्याही भागातील ‘ओ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह’ रक्तगटाच्या व्यक्तीने अशी विशेष तपासणी करून आपला गट दुर्मिळ रक्तगट आहे की नाही हे कळण्यासाठी ओ रक्तगटातील जास्तीत जास्त महिलांनी व पुरुषांनी या तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष तपासणी मोहीमचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
१) तुम्ही जागतिक दर्जाचे रक्तदाते आहात असे सिद्ध होऊ शकते.
२) यदा कदाचित आपला रक्तगट दुर्मिळ असेल आणि भविष्यात आपणासच या रक्तगटाची गरज भासली तर धावपळ होणार नाही.
३) आपण जगाच्या ८०० कोटी लोकसंख्येपैकी विशेष चारशे लोकांपैकी एक असू शकतो.
४) आपल्या रक्तगट दुर्मिळ रक्तगट आहे की नाही याची १०० % खात्री होईल.
सर्व ओ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रक्तगटाच्या महिला व पुरुष रक्तवीरांना आम्ही आवाहन करीत आहोत हिराचंद तानवडे ७७६८८८८६८११ (तालुका अध्यक्ष, सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड), प्रवीण जोग : ९४२३३०३६५५ (तालुका उपाध्यक्ष, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा देवगड), प्रकाश जाधव 9096165582 ९०९६१६५५८२ (तालुका सचिव ) सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग
शाखा देवगड) यांनी केले आहे.
अधिक माहिती व संपर्कासाठी :
जिल्हा उपाध्यक्ष : पंढरीनाथ आचरेकर (वाडा) ९३०७१५८२८६, जिल्हा सहसचिव : रविकांत चांदोस्कर (देवगड) ९४२२५९६९९०,
जिल्हा सदस्य: विजयकुमार जोशी(ईळये) ९४०५८५१५७०
जिल्हा सल्लागार : उद्धव गोरे (जामसंडे) ८७८८३६२६६४
जिल्हा सदस्य : महेश शिरोडकर (शिरगांव) ९९२२३९९४५२
तालुका सदस्य : सुधीर तांबे (जामसंडे)९४२०३०७७४४
तालुका सदस्य : प्रसाद दुखंडे (तळवडे) ९४०३५६११९६,
तालुका सदस्य : भावेश पटेल (देवगड) ९४२३३०३७९९,
तालुका सदस्य : जयदीप तिर्लोटकर (तिर्लोट) ८७८८२८६१५६, तालुका सदस्य : दयानंद तेली (हिंदळे) ९४२३८३३०८१ यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)