पोईपमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सत्यनारायण महापूजा आणि डबलबारीचे आयोजन..!
पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांचा उपक्रम…
तिरंगा डबलबारी भजनांचा आमनेसामनेचा सामना आणणार रंगत…!
पोईप | ओंकार चव्हाण : पोईप येथील आदर्श रिक्षा मंडळ व ग्रामस्थ पोईप यांच्यातर्फे येत्या 19 ऑक्टोबरला कोजागिरीपोर्णिमेनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
याचेच औचित्य साधून आयोजकांतर्फे भजनांची तिरंगी लढत तथा तिरंगा भजनबारीचा जंगी सामनादेखील आयोजित केला आहे.
कुडाळ येथील प्रसिद्ध बुवा श्री.गुंडू सावंत विरुद्ध मुंबई सांताक्रूझचे स्टार बुवा श्री.श्रीकांत शिरसाट आणि कुडाळचे लोकप्रीय श्री.अरुण घाडी बुवा या तिघांत रंगणारा हा सामना म्हणजे पोईप व परिसरांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील भजनप्रेमींसाठी एक आगळी वेगळी पर्वणीच आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आदर्श रिक्षा मंडळाचे सदस्य व पोईप ग्रामस्थ सर्वतोपरी मेहनत घेत आहेत.
महापूजेच्या कार्यक्रमांना तमाम लोकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेत डबलबारीचीही रंगत अनुभवावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)