ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मुणगे हायस्कुलचे क्रीडा स्पर्धेत यश ; रिया सावंत विभागीय स्पर्धेसाठी ठरली पात्र.

मुणगे हायस्कुलचे क्रीडा स्पर्धेत यश ; रिया सावंत विभागीय स्पर्धेसाठी ठरली पात्र.

प्रकाशन: 19 Oct 2023 05:27 PM
वाचन संख्या 32

मसुरे | प्रतिनिधी : राज्य शासनाच्या क्रीडा संचालनालयाच्या वतीने आयोजित देवगड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री भगवती हायस्कुल मुणगे आणि कै वीणा सुरेश बांदेकर ज्यू काॅलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस च्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश प्राप्त केले आहे. १७ वर्षाखालील मुली गटातून १०० मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात रिया अरविंद सावंत हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत ती कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
देवगड तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष खालील मुली ( ८०० मी धावणे प्रेक्षा पुरूषोत्तम सावंत –प्रथम क्रमांक,
(१५०० मी धावणे )
प्रेक्षा पुरूषोत्तम सावंत–प्रथम क्रमांक
(१०० मी– हर्डल्स)
रिया अरविंद सावंत–द्वितीय क्रमांक.
१७ वर्ष खालील मुलगे
(११० मी हर्डल्स) श्रेयस सुरबा सावंत –प्रथम क्रमांक,
आर्यन देविदास राणे–द्वितीय क्रमांक,
(३००० मी धावणे) विराज विश्राम मुणगेकर –तृतीय क्रमांक.

भालाफेक मध्ये आर्यन सुर्यकांत घाडी–प्रथम क्रमांक, तीहेरी उडी मध्ये विवेक मोहन परब–प्रथम क्रमांक. गोळाफेक मध्ये आर्यन सूर्यकांत घाडी -द्वितीय क्रमांक. ५ किलोमीटर चालणे मध्ये भूषण संतोष खरात -प्रथम क्रमांक, स्वयंम रविंद्र रूपये -द्वितीय क्रमांक. १४ वर्ष खालील मुलगे गोळाफेक मध्ये अथर्व दयानंद पटर्वधन-प्रथम क्रमांक. ८० मी हर्डल्स मध्ये मृगाक्षी मंगेश हिर्लेकर -प्रथम क्रमांक यांनी यश प्राप्त केले होते.

ज्यू कॉलेज मधून ११० मी हर्डल्स या प्रकारात प्रथम क्रमांक सोमनाथ संजय घाडी, द्वितीय शुभम शंकर परब यांनी यश प्राप्त केले होते. सर्व विध्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एन जी वीरकर यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका एम बी कुंज, सौ. गौरी तवटे, हरीश महाले, एन जी वीरकर, प्रसाद बागवे, सौ कुमठेकर, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स