ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
चाफेड - गावठण येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक जयवंती राणे यांचे निधन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चाफेड - गावठण येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक जयवंती राणे यांचे निधन.

प्रकाशन: 19 Oct 2023 05:09 PM
वाचन संख्या 203

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील चाफेड – गावठण येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक श्रीमती जयवंती अनंत राणे ( ८७ ) यांचे बुधवारी १८ ऑक्टोबरला मुंबई येथे सकाळी ७.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई वांद्रे पूर्व येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे शिक्षक सुधीर राणे यांच्या त्या मातोश्री तर मुंबई वांद्रे पश्चिम येथील भाभा हॉस्पिटल च्या परिचारिका सौ. साक्षी राणे यांच्या त्या सासू होत. तसेच माजी सरपंच सौ. संचिता संतोष भोगले यांच्या त्या मोठ्या आत्या होत. तर प्रख्यात भजनी बुवा विशाल राणे व चाफेड चे उपसरपंच महेश राणे , शिवसेना शाखाप्रमुख उदय राणे यांच्या त्या काकी होत. त्या अतिशय मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने चाफेड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स