ऍडव्होकेट श्री ह्रदयनाथ चव्हाण यांचा सत्कार.
कट्टा (मालवण) | प्रतिनिधी : मालवण न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील या मानाच्यापदी नियुक्त झालेले नांदोस गावचे सुपुत्र ऍड.श्री.हृदयनाथ चव्हाण यांचा गौरव व सत्कार ‘वराड – कुसरवे रक्तदाते ग्रुप’ यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी वरची गुरामवाडी ग्रामपंचायतचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रुपचे मार्गदर्शक श्री.सुनीलजी नाईक, वराड पंचायत समिती सदस्य विनोदजी आळवे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी ग्रुपचे सदस्य ऍड. प्रदीप मीठबावकर, समाजसेवक प्रवीण मिठबांवकर, उद्योजक समीर रावले, जगदीश परब, पोलीस नाईक नितीन शेट्ये, युवराज ढोलम, जी एच फिटनेसचे सर्वेसर्वा गौरव हिर्लेकर, दिपक कवठणकर, सतीश (भाई) वेंगुर्लेकर, राकेश डगरे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)