ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली अग्निवीर रेणुका विलास राणे हिचा मुणगे येथे सन्मान ; हिंदळे गांवची सुकन्या आहे रेणुका राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली अग्निवीर रेणुका विलास राणे हिचा मुणगे येथे सन्मान ; हिंदळे गांवची सुकन्या आहे रेणुका राणे

प्रकाशन: 17 Oct 2023 10:06 AM
वाचन संख्या 321

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या हिंदळे ता. देवगड येथील सुकन्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ‘अग्निवीर’ कु. रेणुका विलास राणे हिची भारतीय सैन्य दलात निवड झाल्या बद्दल मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव याच्या हस्ते देवी भगवती मंदिर येथे सत्कार करण्यात आला.
   
हिंदळे गांवची सुकन्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहिली अग्नीवीर असलेली कु. रेणुका विलास राणे हिचे बेंगलोर येथील प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण झाले आहे. आता तिची भारतीय सैन्यात निवड झाली असून आसाम येथे नियुक्ती झालेली आहे. ही बाब  हिंदळे गांवाच्या तसेच देवगड तालुक्याच्या दृष्टीने  अत्यंत अभिमानाची आहे. तिच्या या प्रचंड यशाचे गमक तिची अपार मेहनत, ग्रामदैवत श्री काळभैरव आणि देवी भगवती यांचे आशिर्वाद आणि तिच्या आई – वडिलांचे पाठबळ हेच आहे. कु. रेणुका हिचे अभिनंदन आणि कौतुक करावे तितके थोडेच आहे. कु. रेणुका हि सैन्य दलात दाखल होण्यासाठी जाणार असून त्यानिमित्ताने मुणगे येथील प्रसिद्ध देवस्थान देवी भगवतीच्या दर्शनासाठी आली असताना मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव यानी कु.रेणुका हिचा गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सन्मान केला,  तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी श्री देवी भगवती आणि श्री देव काळभैरवाने अशीच कृपादृष्टी ठेवावी आणि तिची उत्तरोत्तर प्रगती करावीत अशी प्रार्थना करत कु. रेणुका हिला तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी सरपंच सौ. साक्षी गुरव यानी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी देवी भगवती देवस्थानचे विश्वस्त कृष्णा सावंत, अनिल धुवाळी, प्रमोद वळंजू, विनोद सावंत,सुनील सावंत, अमित सावंत आदी उपस्थित होते. कु.रेणुका राणे हिचे आजोळ मुणगे कारिवणेवाडी येथील पाडावे यांचे घरी आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स