उद्या कुणकेश्वरला बुवा अक्षय बोरकर विरुद्ध बुवा श्री संतोष जोईल यांच्यात डबलबारी..!
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या श्री क्षेत्र देव कुणकेश्वर मंदिर येथे उद्या १६ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता आमने – सामने डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. कोकण रत्न बुवा श्री संतोष शिर्सेकर व बुवा श्री अभिषेक शिरसाट यांचे शिष्य बुवा अक्षय बोरकर (मुणगे- देवगड) विरुद्ध भजनसम्राट बुवा श्री श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य बुवा श्री संतोष जोईल या दोन भजनी बुवांमध्ये हा सामना रंगणार आहे. अक्षय बोरकर यांना पख़वाज तुषार शिंदे, तबला सुनील बोरकर (मुणगे) आणि चकवा मनोज सावंत हे साथ करणार आहेत. तर बुवा संतोष जोईन यांना पख़वाज अक्षय मेस्त्री, तबला मांगिरीश घाडी हे साथ करणार आहेत.
या जंगी डबलबारीला भजन प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जोगेश्वरी मंडळ कुणकेश्वर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)