ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देत घेतला किल्ल्याच्या अवस्थेचा व छत्रपती शिवराजेश्वर मंदिराच्या सद्य स्थितीचा आढावा ; स्थानिक आमदार व खासदार यांच्या अनास्थेबद्दल केली जोरदार टीका.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देत घेतला किल्ल्याच्या अवस्थेचा व छत्रपती शिवराजेश्वर मंदिराच्या सद्य स्थितीचा आढावा ; स्थानिक आमदार व खासदार यांच्या अनास्थेबद्दल केली जोरदार टीका.

प्रकाशन: 16 Oct 2023 03:32 PM
वाचन संख्या 213

भाजपने नौसेना दिन हा स्वतःचा सोहळा समजू नये व सोहळ्यावर मनसेचे संपूर्ण लक्ष असेल असा दिला इशारा.

मनसे आजी माजी पदाधिकारी, मनविसे पदाधिकारी व महिला पदाधिकारी व मनसैनिक होते उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी मालवणातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गला आज भेट दिली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री आई देवी भवानी मंदिर व छत्रपती शिवराजेश्वर मंदिर दर्शनासाठी हा विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता. सोबतच नौसेना दिना निमित्ताने किल्ले सिंधुदुर्गची सद्य स्थिती नेमकी कशी आहे त्याचाही त्यांनी आढावा घेतला. माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्यासोबत मनसेचे माजी पदाधिकारी, मनविसेचे पदाधिकारी, महिला सदस्य व मनसैनिक उपस्थित होते.

दुपारी १२ वाजता मालवण बंदर जेटी येथून होडीने निघून १२ :३० वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवराजेश्वर मंदिरात जाऊन माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी सर्व सहकार्यांसोबत छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले व चरणी श्रीफळ अर्पण केले. त्यानंतर त्यांनी शिवराजेश्वर मंदिरातील सभामंडप व सभोवताली फिरुन मंदिराच्या स्थितीचा आढावा घेतला आणि मानकरी श्री. पाडावे यांच्याशी मंदिर डागडुजी व सुशोभीकरणा बाबतीत चर्चा केली. त्यानंतर सर्वांसोबत श्री आई देवी भवानी मंदारात भेट देत त्यांनी श्रीफळ अर्पण करुन वंदन केले.

या नंतर बोलताना मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी सत्ताधारी तसेच स्थानिक आमदार व खासदार यांच्या किल्ले सिंधुदुर्गच्या अनास्थेबद्दल व सद्य स्थितीबाबत जोरदार टीका केली व हे सर्व केवळ पेपरबाजी व फसवणूक करणारे नेते असल्याचा टोला हाणला. नौसेना दिन सोहळा हा भाजपचा खाजगी सोहळा नसून संपूर्ण देशाचा असल्याचे सांगत त्यांनी या सोहळ्यावर मनसेचे संपूर्ण लक्ष असेल असा इशारा दिला. लवकरच जर किल्ल्याची अवस्था सुधारली गेली नाही तर किल्ले सिंधुदुर्गवर मनसे मार्फत नियोजन बद्ध पद्धतीने स्वच्छता व साफसफाई मोहीम आखली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांचे नेहमीच काटेकोरपणे पालन मनसैनिक करत असतात आणि लवकरच त्यानुसार जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्या होतील असे सांगत त्यांनी काहीही झाले तरी मनसेचे सामाजिक कार्य चालूच आहे व राहील असे स्पष्ट केले.

या वेळी मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर, हेमंत उपरकर, मनसे माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, मनविसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अमित इब्रामपूरकर, माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, हितेंद्र काळसेकर, माजी पदाधिकारी विल्सन गिरकर, विले पार्ले विभाग उपाध्यक्ष अभिजीत मेथर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल, मनविसेचे तालुका अध्यक्ष संदीप लाड, मनसे कट्टा पदाधिकारी कुणाल माळवदे, श्रीकृष्ण परब, संतोष सावंत, महिला सदस्य भारती वाघ, भाग्यश्री लाकडे, प्राजक्ता आढाव असे आजी माजी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स