ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बंदला कणकवलीत थंड प्रतिसाद!

बंदला कणकवलीत थंड प्रतिसाद!

प्रकाशन: 11 Oct 2021 01:08 PM
वाचन संख्या 92

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दुकानदारांना बंदात सहभागी होण्याचे केले आवाहन…!

कणकवली | उमेश परब :उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍यांना अत्यंत क्रूर पद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. कणकवली शहरात सकाळच्या सत्रात दुकाने उघडली होती. त्यामुळे या बंदला थंडा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर आप्पासाहेब पर्टवर्धन चौकात पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून दोन दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, हा बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली असून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखा ते आप्पासाहेब पर्टवर्धन चौकापर्यंत फेरी काढत आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदात सहभागी होण्याचे आवाहन केले. लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करून या हत्याकांड घडवून आणणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी केली. यावेळी आम.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, संदेश पारकर, राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक, बाबू सावंत, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स