ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
दुकाने बंद करण्यासाठी शटरवर शिवसैनिकांनी घातल्या लाथा

दुकाने बंद करण्यासाठी शटरवर शिवसैनिकांनी घातल्या लाथा

प्रकाशन: 11 Oct 2021 12:59 PM
वाचन संख्या 223

वैभव नाईकांकडून कणकवली भडकविण्याचा प्रयत्न

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप
कणकवली | उमेश परब : महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद वेळी कणकवली पटवर्धन चौकात शिवसैनिकांनी सुरू असलेल्या बेकरीच्या शटरवर लाथा मारल्या. शिवसेनेच्या या जबरदस्तीचा निषेध करत आहोत. आमदार वैभव नाईक कणकवली भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कुडाळात जाऊन दुकाने बंद करावीत. व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिल्यास आम्ही व्यापाऱ्यांसोबत आहोत. त्या बेकरी मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहोत असेही नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले.

लखीमपूर मधील घटनेचा आम्हीही निषेध करतो. ज्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली त्यांना गुलाबपुष्प देत नगराध्यक्ष नलावडे यांनी स्वागत केले. कणकवली शहरात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदचा पुरता फज्जा उडाला. मात्र सुरू असलेल्या बेकरीचे शटर माजी नगरसेवक असलेल्या शिवसैनिक भूषण परुळेकर व अन्य शिवसैनिकांनी जबरदस्तीने बंद केले. या धाकदपटशाही चा आम्ही निषेध करतो. एकेकाळी बाळासाहेबांनी एक आवाज दिला की सगळा महाराष्ट्र ठप्प होत असे. पण आता शिवसेनेच्या हाकेवर एक दुकान बंद होत नाही, याचे आत्मपरीक्षण सेनेने करावे, असा टोलाही नगराध्यक्ष नलावडे यांनी लगावला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स