ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग काॅलेज संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे यश ; शिरवंडेतील तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा.

मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग काॅलेज संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे यश ; शिरवंडेतील तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा.

प्रकाशन: 15 Oct 2023 08:10 AM
वाचन संख्या 242

विनीत मंडलीक | मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या शिरवंडे येथे संपन्न झालेल्या क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित मालवण तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये स.का.पाटील सिंधुदुर्ग काॅलेज संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
          
मुलांमध्ये आदेश हाक्के याने ४०० मी. धावणे द्वितीय क्रमांक ,३ किमी. धावणे  द्वितीय क्रमांक,गोळाफेक द्वितीय क्रमांक मिळवला. मिथिलेश खराडे  भालाफेक द्वितीय क्रमांक, साईप्रसाद अटक : २०० मी. धावणे तृतीय क्रमांक तसेच उंच उडी  तृतीय क्रमांक मुलींमध्ये रेश्मा पांढरे यांनी ८०० मी. धावणे प्रथम क्रमांक,थाळीफेक : द्वितीय क्रमांक,लांबउडी :  द्वितीय क्रमांक मिळवला.क्षितिजा खरवते ४०० मी धावणे द्वितीय क्रमांक , आर्या किडये १०० मी. धावणे प्रथम क्रमांक , निर्जरा कांबळी १०० मी हर्डल्स प्रथम क्रमांक प्राप्त केला.

४×४०० मी. रिले मध्ये मुलींच्या संघाने  प्रथम क्रमांकप्राप्त केला असून त्यात१) रेश्मा पांढरे२) क्षितिजा खरवत३) आर्या किडये
४) नियती पारकर यांचा समावेश होता
तसेच ४×१०० मी. रिले मध्ये मुलींच्या संघाने  द्वितीय क्रमांक पटकावला त्यात१) निर्जरा कांबळी२) दिक्षा झोरे३) दिक्षा सुर्वे
४) साबिया शेख यांचा समावेश होता.
यशस्वी विद्यार्थ्यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे.

या यशस्वी विद्यार्थीनी विद्यार्थी खेळाडूंचा श्री. शैलेश पावसकर व प्राचार्य डाॅ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व क्रीडा मार्गदर्शक प्रा.हसन खान, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा.डॉ.हंबीरराव चौगले, प्रा.शंकर खोबरेकर, प्रा.डॉ.देवीदास हारगिले व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स